नाशिक : शरणपूररोड भागात विवाहीतेचा एकाच इमारतीत राहणा-या दोघा नातेवाईकानेच विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरज नारंग व सतबीर कौर नारंग (रा.होलाराम कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित व पीडित विवाहीता एकमेकांचे नातेवाईक असून ते एकाच इमारतीत राहतात. गेल्या सोमवारी विवाहीता दुपारच्या सुमारास सोसायटीच्या तळमजल्यावर पाणी भरण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयित निरज नारंग याने वाटेत अडवून तिचा विनयभंग केला. तर संशयित सतबीर कौर याने पीडिता आपल्या आईकडे वाच्यता करेल या भितीतून तिला अश्लिल शिवीगाळ करीत धक्का मारला. या घटनेत पीडितेच्या डोळय़ास दुखापत झाली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.