नाशिक – पंचवटी कारंजा येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईलच्या दुकानातील विविध कंपन्यांचे ३६ नवीन मोबाईल व चार जुने मोबाईल १५ हजार रुपये रोख लंपास केले आहे. पंचवटी कारंजा येथील शांती कुटीर गाळा नंबर ४, मुक्ता मोबाईल शॉप या नावाचे दुकानातून रात्री शटर उचकून दुकानात प्रवेश करून ही चोरी करण्यात आली. या चोरीची तक्रार योगेश प्रवीणचंद्र पोमल यांनी दिली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत दुकानातील विविध कंपन्यांचे ३६ नवीन मोबाईल, चार जुने मोबाईल व १५ हजार रुपये रोख रक्कम असा ७० हजार १६८ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार अरुण चव्हाण करीत आहेत.