नाशिक – चुंचाळे गावात धारदार शस्त्राने महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. संगिता सचिन पवार (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी चौकशीसाठी तीच्या पतीला ताब्यात घेतले आहे. २७ जून रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती औरंगाबाद येथील शहर नियंत्रण कक्षातून अंबड पोलिसांना फोनवर मिळाली. त्यानंतर ही माहिती समजताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी चौकशीसाठी तीचा पती सचिन पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही हत्या का करण्यात आली याचा तपास पोलिस करत आहे.