नाशिक – चंद्रभान हॉस्पिटलच्या जवळ जाणता राजा कॉलनी रोड येथे चार चाकी गाडीने धडकेने १४ वर्षाच्या सायकलस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. साई मोहन देशमुख (१४) हा असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. साई हा सायकलने त्याच्या घरी जात असतांना पाठीमागून येणा-या बोलेरो गाडीने त्याला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर बोलेरो चालक सम्राट चंद्रकांत पगारे (२७,रा. कळमधरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने अपघाताची खबर न देता पळून गेला. पोलिसांनी त्याला पकडून गजाआड केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाय. एस. माळी करीत आहेत.