नाशिक : मधुबन कॉलनीत माहेरी आलेल्या ३६ वर्षीय विवाहीतेने स्व:तास पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. रूपाली गणेश भोट (मुळ रा. शिवाजीनगर सिन्नर,हल्ली मधुबन कॉलनी,पंचवटी) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. रूपाली भोट या मनोरूग्ण असल्याने त्यांच्यावर गेल्या ४ ते ५ वर्षापासून उपचार सुरू होते. उपचार करूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने काही महिन्यांपासून त्या मधुबन कॉलनी येथे आपल्या माहेरी राहत होत्या. सोमवारी सकाळी आजारपणास कंटाळून त्यांनी राहत्या घरात स्व:तास पेटवून घेतले होते. या घटनेत त्या गंभीर भाजल्याने भाऊ निलेश सोमवंशी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.