नाशिक : शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी (दि.७) गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी आडगाव आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पहिली घटना किशोर सुर्यवंशी मार्ग भागात घडली. पुनम बबन खांदवे (१८ रा.अनन्या हाईटस,ओंकारनगर) या तरूणीने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी बेडरूममध्ये छताच्या कडीस स्टोल बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच बहिण अश्विनी खांदवे यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्मालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत. दुसरी घटना औरंगाबादरोडवरील निलगीरी बाग भागात घडली. आकाश मोतीराम आंबेकर (२० रा.म्हाडा बिल्डींग) या युवकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास बेल्ट बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पप्पू पवार व प्रविण शिरोळे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.