नाशिक : शहरात वेगेगळया भागातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहे. दोघी मुलींना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस आणि आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत घडली. परिसरातील अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि.६) सकाळी आपल्या मैत्रीणींसमवेत गंगापूररोडवरील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेली ती अद्याप परतली नाही. सर्वत्र चौकशी करूनही ती मिळून न आल्याने कुणी तरी तिचे अपहरण केल्याचा संशय वर्तविण्यात येत असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत. दुसरी घटना आडगाव पोलिस ठाणे हद्दीत घडली. येथील अल्पवयीन मुलगी गेल्या २२ मे रोजी रात्री पासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने कुणी तरी तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.