नाशिक : दसकगावात चक्कर येवून पडल्याने ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. नईम हबीब शेख (रा.फकीरवाडी,जुनेनाशिक) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख रविवारी (दि.७) दसक गावात स्वयंपाकाच्या कामासाठी गेले होते. हनुमान मंदिर भागात ते काम करीत असतांना अचानक चक्कर येवून पडले होते. मालक संतोष महाले यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.