नाशिक – महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील सीकेडी प्लॉट येथून चोरट्यांनी ४ लाख ५० हजार रूपये किमतीचे व्हेरिंटो कारचे इंजिन फ्युएल इंजेक्टर पार्ट चोरून नेले. या चोरीप्रकरणी प्रभाकर नारायणराव जाधव (रा.राणेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लॉटचे व्यवस्थापक आहेत. गेल्या १५ जुलै ते ५ ऑगष्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीत बेकायदा प्रवेश करून सुमारे ४ लाख ५० हजार रूपये किमतीचे व्हेरिंटो कारचे इंजिन फ्युएल इंजेक्टर पार्ट चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.