नाशिक – सिडकोत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम संबध ठेव नाही तर जीवे मारण्याची धमकी देत हे कृत्य करण्यात आले आहे. अक्षय पवार असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी शनिवारी शिवशक्ती चौकातून पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडवत हे कृत्य केले. माझ्याशी प्रेम संबध ठेव नाही तर तुमचा बेत पाहतो अशी धमकी देत त्याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने घरी जावून आपल्या आईकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.