नाशिक : इंदिरानगर भागात शनिवारी दोन आत्महत्याच्या घटना वेगवेगळ्या भागात घडल्या आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिल्या घटनेत देवी हिरालाल रावत (रा.बिल्डींग नं.३,पाटील गार्डन कृष्ण मंदिराजवळ) यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास घरासमोरील पाटील गार्डन येथील आंब्याच्या झाडाला अज्ञात कारणातून ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. रावत यांच्यावर गेल्या वर्षभरापासून मनोरूग्ण असल्याने उपचार सुरू असल्याचे बोलले जात असून आजारपणाच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. पती हिरालाल रावत यांनी खबर दिली. दुसरी घटना रथचक्र चौकात घडली. दिपक श्रीराम गोवर्धने (५३ रा.पराग अपा.महाराष्ट्र बँकेमागे) यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आशिष मंडलकार यांनी दिलेल्या खबर दिल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हादगे व हवालदार कोकाटे करीत आहेत.