नाशिक– अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित चंद्रकांत भोर (२३ रा.आहूली ता.इगतपुरी) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडीतेच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर २०२० ते २४ जून २०२२ दरम्यान रात्रीच्या वेळी आहूली शाळा मैदान आणि पाण्याच्या टाकीजवळ घेऊन जात बलात्कार केला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरुन अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत