नाशिक : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद होऊन एकाने हत्याराने पोटात मारून युवकाला जखमी केल्याची घटना पंचवटीतील मोरे मळ्यात घडली आहे. या घटनेत ऋषिकेश भडांगे हा जखमी झाला आहे. निलेश रणमाळे असे संशयिताचे नाव आहे. भडांगे याने या मारहाणीबाबत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मोरे मळ्यातील संदीप साळवे यांच्या घरी शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी मी व मित्र नाचत असताना, धक्का लागल्याच्या कारणावरून संशयित निलेश याने त्याच्याकडील हत्याराने पोटात मारून जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.