नाशिक : कार खरेदी विक्री व्यवहाराच्या फसवणूक प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज न भरता वाहनाची विल्हेवाट लावल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी बाळू सुधाकर काळे (रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,बिडी कामगार नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. इरफान शेख (रा.दत्त मंदिराशेजारी,बिडी कामगार नगर) असे फसवणूक करणा-या संशयिताचे नाव आहे. काळे यांच्या मालकिची एमएच १७ एझेड १३३३ इर्टिका कार संशयिताने फेब्रुवारी २०१८ मध्ये विकत घेतली. पाच लाखात हा व्यवहार झाला होता. काही रक्कम काळे यांना सुपूर्द करीत संशयिताने बँक कर्ज फेडण्याची हमी घेतली होती. मात्र संशयिताने हप्ते न भरता वाहनाची परस्पर विल्हेवाट लावून काळे यांची फसवणूक केली. कर्ज थकल्याने बँकेने तगादा सुरू केला असता काळे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.