नाशिक : घरफोडीत चोरट्यानी सुमारे ६३ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना महात्मानगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार शिवदास ठाकूर (रा.राधानगरी रो हाऊस,विकास कॉलनीमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठाकूर कुटुंबिय गेल्या शनिवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून दुस-या मजल्यावरील बेडरूमधील कपाटातून हि-याचे कर्णफुले, सोन्याच्या नथ,चांदीचा कलश,दोन तामन व चांदीचे कॉईन असा सुमारे ६३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
…….
वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी केली आत्महत्या
नाशिक : शहर परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यात २५ वर्षीय तरूणासह ६४ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना पाथर्डीरोड येथे घडली. पुंडलिक संतू बोराडे (६४ रा.पिंपळगाव खांब) यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करम्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत. दुसरी घटना दिंडोरीरोडवर घडली. आकाश दत्तू पवार (रा.वज्रेश्वरी झोपडपट्टी) या युवकाने सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपाला स्कार्प बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत बापू सुर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.