नाशिक – शहरात सहा महिन्यांत ३६१ हून अधिक सायबर क्राईमच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात या तक्रारीत वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे. सायबर क्राईमच्या तक्रारीमध्ये फसवणूक, अकाऊंट हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, नेट बँकिंग यांचा समावेश आहे. ऑनलाईन पध्दतीने फसवणूक झाल्यावर तक्रार देऊनही त्यातून फारसा दिलासा मिळत नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
सायबर क्राईमच्या या तक्रारीचा तपास करण्यात पोलिसांनाही अनेक अडचणी येत असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसात ऑनलाईन पध्दतीने व्यवहार करण्यात वाढ झाली आहे. त्यात बँकिंगचा वापर मोठा होता. त्यात ब-याच वेळा फसवणूक होते. तर काही तक्रारी या सोशल मीडियाच्या बाबतीत आहे. यातून ही फसवणूक केली जाते. अनेक जण आता इंटनेटचा मोठया प्रमाणात वापर करत असल्यामुळे त्यातून काही घटना होत आहे.