भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी दोन लाखाचा ऐवज केला लंपास
नाशिक : भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. मखमलाबाद रोडवरील तांबे मळा भागात ही घरफोडी झाली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय माधव खिंडे (रा.चामुंडा ग्रीन,गॅस गोडावून समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खिंडे कुटुंबिय शनिवारी सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे व पर्स मधील एक हजार रूपये असा सुमारे १ लाख ८७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
खासगी बसची डिक्कीतून स्टेपनी चोरीला
नाशिक : त्र्यंबकरोडवरील जिल्हा रूग्णालय जवळ पार्क केलेल्या खासगी बसची डिक्की खोलून चोरट्यांनी स्टेपनी चोरून नेली. या चोरीप्रकरणी जितेंद्र रमेशचंद्र कटारीया (रा.मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरुन मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटारीया ट्रव्हल्स बसचालक असून, शनिवारी रात्री ते मध्यप्रदेश येथून प्रवासी घेवून शहरात दाखल झाले होते. जिल्हा रूग्णालयासमोरील सार्वजनिक शौचालया समोर नेहमी प्रमाणे बस पार्क करून ते झोपी गेले असता चोरट्यांनी बसच्या पाठीमागील डिक्की उघडून सुमारे दहा हजार रूपये डिक्ससह असलेले टायर चोरून नेले. अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.