:नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा )- पुतण्यांच्या बचावासाठी भांडणात मध्यस्थी करणा-या काकास टोळक्याने मारहाण केली आहे. या मारहाणीत काका जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधु कापसे, शांताराम कापसे, अनिल कापसे, आनंद कापसे व संदिप कापसे (रा.सर्व सिध्दार्थ नगर,एकलहरा मेनगे) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी लुकमान इस्माईल कुरेशी (रा.सिध्दार्थ नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, कुरेशी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ओझर येथील काम आटोपून घराकडे जात असतांना डर्क इंडिया कंपनीच्या समोरील एकलहरा राख डॅम्पच्या पायथ्याशी संशयित टोळके पुतणे शहबाज कुरेशी आणि मोसीन कुरेशी यांना मारहाण करीत होते. यावेळी पुतण्यांच्या बचावासाठी धाव घेतली असता, मध्यस्थी करीत असतांना संशयित आनंद आणि अनिल कापसे यांनी अॅल्युमिनीअमचा पाईप व खाली पडलेला वजनी दगड उचलून पायावर टाकून जखमी केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.