बाथरूममध्ये चक्कर येवून पडल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नाशिक : जयभवानी रोड भागात बाथरूममध्ये चक्कर येवून पडल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंटू चौधरी (रा.मनोहर गार्डन,जेवननगर) असे मृत इसमाचे नाव आहे. चौधरी रविवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत होवून बेशुध्द झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
३६ वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागातील साने गुरूजी नगर येथे राहणा-या ३६ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन मारूती कुसाळकर (रा.पेंढारकर कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुसाळकर यांनी रविवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी लोखंडी हँगरला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा चेतन कुसाळकर याने शेजाºयांच्या मदतीने त्यांना तातडीने बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.