नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – रामशेज किल्ल्यावर सिडकोतील शिवपुरी चौकातील अजय सरोवर (वय २०) या तरुणाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचे वडील नारायण सरोवर यांचा फळे विक्रीचा व्यवसाय करतात. सरोवर कुटुंबिय आज सकाळी रामशेज किल्ल्यावर गेले होते. यावेळेस अजय चक्कर येऊन पडला. सरोवर कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, त्याचा उपयोग झाला नाही. डॅाक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेमुळे सरोवर कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सिडको परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.