नाशिक : कालिकानगर भागात भावाशी वाद घातल्याच्या कारणातून तरूणावर कोयत्याने हल्ला प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेत २० वर्षीय युवक जखमी झाला आहे. विशाल ताराळकर उर्फ मेंढ्या (रा.कालिकानगर,पंचवटी) असे तरूणावर कोयत्याने हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अश्पाक रफिक पठाण (रा.लाल बावटा गल्ली,कालिकानगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याचा संशयित तारावळकर याच्या भावासमवेत वाद झाला होता. त्यावरून संशयिताने पठाण यास गाठून हा हल्ला केला. पठाण गुरूवारी रात्री कालिकानगर येथिल खंडोबा मंदिराजवळून जात असतांना संशयिताने त्यास भावाशी वाद घातल्याच्या कारणातून शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त संशयिताने कमरेस लावलेला कोयता काढून पठाणवर हल्ला केला. या घटनेत पठाण याच्या हातावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक लोणारे करीत आहेत.