नाशिक : मोरे मळा भागात चुलीवर स्वयंपाक करताना भाजलेल्या १७ वर्षीय युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमल राजू रगडे (१७, रा. पगारे मळा, उपनगर) असे मयत युवतीचे नाव आहे. गेल्या २ तारखेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कोमल ही राहत्या घरात स्वयंपाक करीत होती. त्यावेळी तिची ओढणी चुलीवर पडून लागलेल्या आगीत ती ५९ टक्के भाजली होती. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.२५) रात्री तिचा मृत्यु झाला.