नाशिक : महामार्गावरील के.के.वाघ इंजिनिअरींग कॉलेज भागात चोरट्यांनी घरफोडी करून देवा-हयातील व कपाटात ठेवलेल्या चांदीचे वस्तू आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरुन नेलेल्या वस्तुंमध्ये गणपतीचा मुकूट, हार,दुर्वांची जुडी, पान,सुपारी तसेच कपाटातील पायातील पैंजन,जोडवे, चांदीची आणि सोन्याची पॉलिस असलेल्या गणपतीच्या दोन मुर्त्या,घड्याळ व महत्वाच्या कागदपत्राचा समावेश आहे. संजय धर्मराज कोठावदे (रा.मातृदर्शन कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठावदे कुटुंबिय १३ ते २० जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. अधिक तपास जमादार पाथरे करीत आहेत.