नाशिक : राणे नगर बोगदा येथे दुचाकी घसरल्याने ६७ वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. शोभा चंद्रकांत फोरे (रा.स्नेहकला अपा. भगवती गॅस जवळ) असे मृत वृध्देचे नाव आहे. या घटनेत दुचाकीवरून पडल्याने फोरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फोरे या गेल्या सोमवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास आपल्या मुला समवेत मोटारसायकवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. राणे नगर येथून गोविंद नगरच्या दिशेने मायलेक दुचाकीवर प्रवास करीत असतांना बोगद्यात दुचाकी घसरली होती. या घटनेत त्या जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील वसंत पवार हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.