नाशिक : वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी शुक्रवारी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी म्हसरूळ,पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तीन आत्महत्येत एका ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिली घटना फुलेनगर येथे घडली. वकिल किसन शिंदे (६१ रा.भराडवाडी) या वृध्दाने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अनिल कांडेकर यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. तर दुसरी घटना पेठरोडवर घडली. प्रशांत दशरथ मांडवे (३७ रा.राजेय सोसा.यशोदानगर,मेहरधाम) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रविण मांडवे यांनी खबर दिल्याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत. तर याना तरूण कार्डा (३५ रा.रॉयल कॉलनी,अशोकामार्ग) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच आत्या मिना निहलानी यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.कल्पना शिंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.