नाशिक : सिडकोतील पवननगर भागात राहत्या घराच्या ओट्यावर पाय घसरून पडल्याने ६३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. चंद्रकांत रामदास चौधरी (६३ रा.महालक्ष्मी चौक,मटन मार्केट समोर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौधरी बुधवारी (दि.२७) रात्री आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर चक्कर मारत असतांना ही घटना घडली. अचानक चक्कर येवून ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्याच्या तोंडास मार लागल्याने ते बेशुध्द झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.