नाशिक : जुने नाशिक परिसरातील मोठा मातंगवाडा भागात रस्ता अडवून एकाने बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादीक शेख (रा.भारतनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या वर्षी १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास दहावीच्या पेपर देण्यासाठी सारडा कन्या विद्यालयात जात असतांना ही घटना घडली होती. पूर्वी शेजारी राहणा-या संशयिताने मातंगवाड्यातील मरी माता मंदिर भागात मुलीस अडवीत तू माझ्याशी का बोलत नाही असे म्हणून तिचा विनयभंग केला. यावेळी संशयिताने बदनामीसह कुटूंबियांना सांगण्याची धमकी दिली. तसेच यानंतर वारंवार घराजवळ येवून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.