नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच सात मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या.याबाबत पंचवटी आडगाव सरकारवाडा गंगापूर भद्रकाली इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील आरटीओ भागात राहणारे आकाश मधुकर सोनवणे यांची पल्सर एमएच १५ जेके ७४४६ सोमवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक लोणारे करीत आहेत.
दुसरी घटना पंचवटी कॉलेज भागात घडली. निर्मला मोरेश्वर महाले (रा.समर्थनगर कालेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाले या रविवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास पंचवटी कॉलेज भागात गेल्या होत्या. महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ लावलेली त्यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डीएन २२२६ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
तिसरी घटना जुना गंगापूरनाका भागात घडली. राजेश दिनकर धनवटे (रा.सरिता दर्शन सोसा. चोपडा लॉन्स शेजारी ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धनवटे यांची यामाहा बीटीई ७३८३ मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.११) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
दहिपुल भागात राहणारे सुभाष पिडीयार (रा.आचल साडीच्या वर सरस्वतीलेन) यांची एमएच १५ डीपी ९५५६ मोटारसायकल गेल्या शनिवारी (दि.२१) रात्री आचल साडी दुकानासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. शैलेश गिरधर धांडे (रा. प्रभू प्रसाद सोसा. एचपीटी कॉलेज मागे,कॉलेजरोड) यांची एमएच १५ इक्यू ५६६५ मोटारसायकल शनिवारी (दि.२१) रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरीस गेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
मुकणे ता. इगतपुरी येथील भाऊसाहेब बहिरू मते हे गेल्या शुक्रवारी (दि.१३) रात्री शहरात आले होते. रात्रीच्या वेळी हॉटेल चांगल चुंगल भागात ते जेवणासाठी गेले असता ही घटना घडली. हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ डीजे ८१९५ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत. तर जेलरोड येथील राजेंद्र नरहरी सानप (रा.जनार्दनस्वामी नगर दसक) हे गेल्या शुक्रवारी (दि.२०) नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात गेले होते. परिसरातील स्टारप्लस मॉल भागात लावलेली त्यांची एमएच १५ इव्ही ६०३२ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार मिलींद शेजवळ करीत आहेत.