नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मध्यरात्रीच्या वेळी वेगवेगळया भागात दबा धरून बसलेल्या चार चोरट्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी (दि.२४) रात्री करण्यात आली. सदर व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आले असून त्यांच्या ताब्यातून चोरी करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका, उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान नुर कुरेशी उर्फ तलीम (२५ रा.मोठा राजवाडा,वडाळानाका) हा रात्री अडीच वाजेच्या सुमारास वडाळारोडवरील भारतनगर भागात संशयास्पदरित्या मिळून आला. याबाबत अंमलदार समिर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत. दुसरी कारवाई नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात करण्यात आली. इम्रान सलीम मनियार (रा.लोहार गल्ली देवळाली कॅम्प) हा संशयित मंगळवारी (दि.२४) रात्री गायकवाड मळा रोडवरील गाजीसा मोबाईल दुकान परिसरात लपून बसलेला आढळून आला. अंमलदार गौरव गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत. तिसरी कारवाई सिडकोतील शुभम पार्क भागात करण्यात आली.
सौरभ राजू सोनवणे (२५ रा.गौरीशंकर मंगल कार्यालया पाठीमागे) हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार मंगळवारी (दि.२४) रात्री परिसरातील रेणूका माता मंदिर परिसरात मिळून आला. तर केतन सुखदेव सानप (२१ रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ सिडको) हा मंगळवारी रात्री पंडीतनगर येथील शनि मदिराच्या आडोश्याला लपून बसलेला मिळून आला. या कारवाईबाबात अंबड पोलीस ठाण्यात अनुक्रमे अंमलदार सचिन करजे व तुषार मते यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten