नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नानेगाव ते भगुर मार्गावर भरधाव दुचाकी घसरल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुदाम आसाराम उदावंत (रा.नाणेगाव ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. उदावंत शनिवारी (दि.४) नाणेगाव येथून भगूरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती.
रामबाग परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ एसएमबीटी रूग्णालयात दाखल केले होते.सोमवारी अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten