नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीजीपीनगर भागात माहेरून पैसे आणले नाहीत या कारणातून छळ करण्यात आल्याने २९ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सासरच्या तीन जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
पंकज एकनाथ गोठे (३० रा.विशाल पार्क,माऊली लॉन्स डीजीपीनगर नं.२) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. याबाबत नितीन सिताराम निरभवणे (रा.उगाव ता.निफाड) यांनी तक्रार दाखल केली आहे. माऊली लॉन्स भागात राहणा-या अनिता पंकज गोठे या विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
या आत्महत्येस पतीसह सासू आणि एक महिला जबाबदार असल्याचा आरोप निरभवणे यांनी तक्रारीत केला आहे. माहेरून पैसे आणले नाही या कारणातून सासरच्या मंडळीने मानसिक व शारिरीक छळ केल्याने अनिता गोठे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संशयित पतीस ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten