नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयताधारी तडिपारास पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आणि हद्दपार कारवाईचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना त्याचा शहरात वावर होता.
वैभव रंजीत लोखंडे (२० रा.अष्टविनायक बिल्डींग,महालक्ष्मीनगर अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. वैभव लोखंडे यास पोलिसांनी दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंबड पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास तो अंबड गावातील हनुमान मंदिर परिसरात मिळून आला.
त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता आढळून आला असून पोलिसांनी तो हस्तगत केला आहे. याबाबत पोलिस नाईक पवन परदेशी यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten