नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरात गुरुवारी भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासात पोलिसांनी या खूनाचा उलगडा करुन पाच आरोपींना ताब्यात घेतले असून तीन आरोपी अद्याप फरार आहे. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मो-या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तीन आरोपींचा शोध सुरु आहे.
गुरुवारी दुपारी भाजी विक्रेते संदीप आठवले (वय २२) या तरुणाचा खून जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात झाला होता. दुचाकीवरुन हे सर्व हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.
ही हत्या का करण्यात आली, कुणी हा हल्ला केला, पूर्ववमनस्यातून हा हल्ला झाला की अन्य काही कारणे आहेत याचा शोध पोलिसांनी घेऊन अवघ्या तीन तासात या खूनाचा उलगडा केला व पाच आरोपींना ताब्यातही घेतले. सलग तिसऱ्या गुरुवारी सिडको परिसरात हत्या झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten