नाशिक : पंचशिल नगर येथील म्हसोबावाडीत दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून एकाने तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली. सोनू रशिद बेग (२८ रा.पंचशिलनगर,गंजमाळ) असे तरूणास मारहाण करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा सुदाम पवार (२४ रा.आडगाव जकात नाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. याघटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पवार हा रविवारी पंचशिलनगर भागात राहणा-या किशोर देशमुख या मित्राकडे मुक्कामी जात असतांना ही घटना घडली. म्हसोबावाडीतून पायी जात असतांना त्यास मद्यधुंद अवस्थेतील संशयिताने अडविले. यावेळी त्याने मद्यसेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. पवार याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या घटनेत पवार जखमी झाला असून अधिक तपा सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.