नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हात उसनवार दिलेल्या आर्थिक देवाण घेवाणीतून एकाने महिलेचा वेळोवेळी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून संशयिताचा अतिरेक वाढल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे.
दगा अनाजी देवरे (रा.मंगलमुर्ती नगर,उपनगर) असे महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून गेल्या वर्षी महिलेने संशयिताकडून काही रक्कम हात उसनवार घेतली आहे. १ फेब्रुवारी २०२२ ते २१ जुलै २०२३ या दीड वर्षांच्या कालावधीत संशयिताने पीडीतेचा पाठलाग करून पैसे मागण्याचा बहाणा करीत विनयभंग केला.
जेलरोड येथील के.एन.केला हायस्कूल,नाशिकरोड येथील भाजी मार्केट परिसरात व कोर्ट परिसरात महिलेस गाठून संशयिताने दमदाटी करीत हे कृत्य केले. संशयिताच्या अतिरेकामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten