नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उधारीत माल घेत संशयिताने दिलेला धनादेश न वटल्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनादेशाच्या माध्यमातून फर्टीलायझर व्यावसायीकाची ही आर्थिक फसवणुक झाल्यामुळे हा व्यवहार पोलिस स्थानकात पोहचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर कैलास शिंदे (रा.सायखेडा ता.निफाड) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी अरूण भाऊराव करणकाळ (रा.डीजीपीनगर,खुटवडनगर कामटवाडे शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. करणकाळ यांचा शेतीस लागणा-या औषध विक्रीचा व्यवसाय असून, जिल्हापरिषद भागात त्यांचे निटको एन्टरप्रायझेस नावाचे दुकान आहे.
या दुकानात संशयिताचे येणे जाणे होते. गेल्या वर्षी संशयिताने करणकाळ यांच्या दुकानातून शेतीउपयुक्त औषधे खरेदी केली होती. यावेळी धनादेश देण्यात आला होता. माल खरेदी पोटी दिलेला धनादेश बँकेत वटण्यासाठी टाकला असता तो जमा रक्कम नसल्याने परत आला होता. वेळोवेळी पैश्यांची मागणी करून संशयिताने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने करणकाळ यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten