कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. आदित्य परशुराम गदादे (१८) व अजय संतोष पेढेकर (१९ रा.दोघे बजरंगवाडी,नाशिक पुणा मार्ग ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहेत. याबाबत पोलिस शिपाई सागर जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंगवाडी येथील कोथमिरे मटन शॉप भागात दोन तरूण कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री धाव घेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांच्या अगझडतीत लोखडी कोयता मिळून आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई, रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-जुगार खेळणा-या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले. औदयोगीक वसाहतीतील बजरंगनगर भागात उघड्यावर हे जुगारी जुगार खेळत होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकिल नझीर रंगरेज (४९ रा.आदित्य दर्शन अपा.श्रमिकनगर), बिपीन धर्मेद्र सिन्हा (३४ रा.एमएचबी कॉलनी,सातपूर), उमेश चिंतामण गवारे (२७ रा. गंगासागर नगर,श्रमिकनगर), विलास अनंता अस्वले (४७ रा.कोळी वाडा,सातपूरगाव) व अविनाश विष्णू गांगुर्डे (२७ रा.अंबिका स्वीटमागे महादेववाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत.
बजरंगनगर येथील हॉटेल आण्णाचा मळा मागे काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२३) सायंकाळी पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित भिंतीच्या आडोश्याला मोकळया जागेत जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार अनंता महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.