नाशिक – चैनस्नॅचींग करणा-याना सराईत दोन संशयतांना साफळा रचुन ६९ ग्रॅम चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले. गेल्या काही दिवसात इंदिरानगर पोलीस ठाणे चैनस्नॅचींगच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी साफळा रचून या दोन चोरांना गजाआड केले आहे. या दोघा चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरांकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
पाथर्डी फाटा परिसरातील नागरे मळ्यातील म्हाडाकॉलनी येथे सापळा पोलिसांच्या पथकाने रचलेल्या साफळयात हे चोर सापडले. संशयित सागर माळी व त्याचा साथीदार गणेश लिपणे हे दोघे आले असता पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी ज्ञानेश्वरनगर, आयोध्या नगरी, निसर्ग कॉलनी, चेतनानगर आदी ठिकाणी भरधाव वेगाने दुचाकी चालवत सोनसाखळी खेचल्याचे कबूली दिली असून संशयित आरोपी ज्या ठिकाणी रहात होते. त्याच परिसरात सोनसाखळी चोरी करत होते. यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
यांनी केली कारवाई
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत चैनस्नॅचींग व घरफोडी गुन्ह्यात वाढ होत असताना राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांविरुद्ध परिसरात कसून तपास सत्र सुरू केल्याने गोपनीय माहिती नुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदासवांजळे, निखिल बोंडे,निसार सय्यद, विशाल नंदकिशोर पाठक, प्रभाकर पवार, सौरभ माळी, सागर परदेशी, जावेद खान, योगेश जाधव मन्सूर शेख, रा मकृष्ण मुंगसे आदींनी ही कारवाई केली.