नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील एक्सप्रेस इन हॉटेल जवळ भरधाव लक्झरी बसने धडक दिल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी ठार झाला. विनीत विजय पगारे (रा. सिडको) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पगारे रविवारी (दि.२८) महामार्गावरील एक्सप्रेस इन हॉटेल समोरील उड्डाणपुलावर पायी रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. मुंबई कडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणा-या खासगी प्रवासी वाहतूक करणा-या लक्झरी बसने (एमपी ०९ एफए ९४०९) त्यास जोरदार धडक दिली.
या अपघातात पगारे याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत योगेश पगारे (रा. नवीन सामनगाव राजवाडा, एकलहरे, ता.जि.नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.