नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत नगर येथील शिवाजीवाडी भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. अरबाज मोईन बागवान (२३ रा.म्हाडा वसाहत भारतनगर) असे अटक केलेल्या तडिपार गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज बागवान याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी दोन वर्षासाठी शहर व जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास तो शिवाजीवाडीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. शिपाई समीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656280726948679680?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656280688881176579?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656280656358559744?s=20