नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक – पुणे मार्गावरील चेहडी फाटा भागात मोटारसायकलचे ब्रेक फेल होवून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरूण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रसाद नामदेव हिंगे (रा.पिंपरवाडी ता.राहता जि.अ.नगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिंगे गेल्या १४ एप्रिल रोजी शिंदे गावाकडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव मोटारसायकलचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात हिंगे गंभीर जखमी झाला होता. मित्र गौरव चव्हाण याने त्यास तात्काळ नजीकच्या रेडीएन्ट हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मुंबईनाका परिसरातील संकल्प हॉस्पिटल दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.गोकुळ इंदाईत यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
जेलरोड भागात बेकायदा दारू विक्री करणारा जेरबंद
जेलरोड भागात बेकायदा दारू विक्री करणा-यास पोलिसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून सुमारे अडिच हजार रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई युनिट २ च्या पथकाने केली.
गोविंद बाबुराव शिंदे (५६ रा.अवधुतकृपा सोसा.सैलानी बाबा बसस्टॉप जवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित दारू विक्रेत्याचे नाव आहे. सैलानी बाबा बस स्टॉप जवळील एका सोसायटी परिसरात बेकायदा दारू विक्री केली जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित आपल्या राहत्या सोसायटी भागात दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे २ हजार ४०० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी हवालदार प्रकाश भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
? *शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय*
https://t.co/fGg02PiopH#indiadarpanlive #maharashtra #state #cabinet #decisions— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 3, 2023
? *मोहम्मद शमीचे हॉटेलातील महिलांशी अनैतिक संबंध!*
हसीन जहाँचा खळबळजनक आरोप
https://t.co/M35TEPT82Y#indiadarpanlive #cricketer #mohammad #shami #sex #relation #hotel #girls— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 3, 2023