नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील त्र्यंबक रोडवरील समृध्द नगर येथे गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून काही अनोळखी तरुणांनी विशाल धाकतोडे या युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत विशाल हा जखमी झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या विशालला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी विशालच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल कामानिमित्त त्र्यंबक रोडवरून स्वतःच्या मोटर सायकलने जात होता. यावेळी अचानक कट लागल्याने अनोळखी तरुणांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात विशाल गंभीर जखमी झाला.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653643029163679745?t=jbafLGkeiEk2pALs9hCG8Q&s=19