नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथे अंबिडा स्वीटसमध्ये कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर पैसे मागितल्याने त्याचा राग येऊन सहा सात जणांच्या टोळक्याने मिठाई व्यावसायिकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासातच या संशयित टोळक्याला गजाआड करण्यात आले. या अगोदर सातपूर येथील अभिषेक बेकरी या ठिकाणी भर दिवसा केक फ्री दिला नाही, म्हणून कोयता काढत व्यावसायिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती.
थेट कामगाराला मारहाण
सातपूरच्या महादेव नगर येथील अंबिका स्वीट्स आहे. येथे पाच ते सहा जणांचे टोळके नाश्ता करण्यासाठी आलेले होते. त्यांनी कोल्ड्रिंक घेतल पण, पैसे दिले नाही म्हणून वादास सुरुवात झाली. त्यानंतर येथील कर्मचाऱ्याला या टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटननेचा नंतर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दहशत वाजवणारे टोळके व्यावसायिकला मारहाण करण्याबरोबर स्वीटमधील साहित्य अस्ताव्यस्त करताना दिसत आहे.
नाशिक : सातपूरच्या अंबिका स्वीट मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद pic.twitter.com/mDk8cFqhDK— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 3, 2023