नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील भाजी मार्केट भागात शहरात वावर ठेवणा-या तडिपारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण उर्फ बादल पवन वाघ (२३ रा.म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे, एरंडवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे.
बादल वाघ याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर व जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच रविवारी (दि.३०) तो मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी अमृततुल्य चहा दुकान भागात असल्याची माहिती खब-याने दिल्याने त्यास बेड्या ठोकण्यात यश आले. याबाबत पोलिस शिपाई नितीन पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
⛔ *खासगी कंपन्यांचे पेट्रोल स्वस्त का आहे?*
सरकारी कंपन्या दर केव्हा घटवणार?
https://t.co/wbR9167r2J#indiadarpanlive #private #companies #petrol #rate #government #companies— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023
? *राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ५ हजार पदांची भरती*
मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
https://t.co/WR4eY8x0K2#indiadarpanlive #medical #sector #5thousand #post #recruitment #maharashtra— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023