नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यांचा माग काढत आहेत.
ममता मनोज जाधव (रा.लोहमार्ग, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव व त्यांची आई सोमवारी (दि.१) शहरात आल्या होत्या. नाशिकरोड बसस्थानकातून मायलेकी शहरात येण्यासाठी सिटीलिंक बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत चोरट्यांनी जाधव यांच्या आईच्या पर्समधील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे दागिणे हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653335312654045186?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653335283709132800?s=20