नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील खुटवड नगर भागात घराच्या छतावरून पडल्याने ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. लता भाऊराव खडके (रा.मारूती मंदिराजवळ, चाणक्यनगर, खुटवडनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडके या गेल्या बुधवारी (दि.२६) आपल्या घराच्या छतावर असतांना ही घटना घडली होती. अचानक तोल गेल्याने त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मुलगा मनोज खडके यांनी त्यांना सुखकर्ता हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653361280777076737?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653335312654045186?s=20