नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. मैत्रीत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने हे कृत्य केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धिरज राजेश जेवरानी (रा.काठेगल्ली) असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे मित्र आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मैत्रीत संशयिताने शहरातील कॉलेजरोडसह तपोवन व विविध ठिकाणी घेवून जात मुलीसमवेत फोटो काढले. यावेळी संशयिताने तिचा विनयभंग केला. सदरचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची संशयिताने धमकी दिल्याने मुलीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक ठाकूर करीत आहेत.
? *राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ५ हजार पदांची भरती*
मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
https://t.co/WR4eY8x0K2#indiadarpanlive #medical #sector #5thousand #post #recruitment #maharashtra— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023
? रामायण यात्रा दर्शन (भाग -११)…
श्रीरामांचा चार महिने निवास… *रामटेकची अशी आहे महती…*
https://t.co/OcNaOlPfUw#indiadarpanlive #ramayan #yatra #part11 #ramtek #nagpur #history #vijay #golesar— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 2, 2023