नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव स्टॅण्ड भागात रस्त्याने पायी जाणा-या परप्रांतीय युवकाची वाट अडवित दुचाकीस्वार त्रिकुटाने दमदाटी करीत मोबाईल हिसकावून नेल्याची घटना वर्दळीच्या घडली. याप्रकरणी ईश्वर मुखलाल कनोजीया (१८ रा.बापू बंगल्याजवळ,इंदिरानगर) या परप्रांतीय युवकाने तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनोजीया याचा कपड्यांना इस्त्री मारण्याचा व्यवसाय असून इंदिरानगर भागात त्याचे चिंतामणी ड्रायक्लिनर नावाचे दुकान आहे. शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास तो कामानिमित्त पंचवटी परिसरात जात असतांना ही लुटमार झाली. मालेगाव स्टॅण्ड येथील एचपी पेट्रोल पंपासमोरून तो दुपारच्या सुमारास पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याची वाट अडवित बाजूला घेवून जात त्यास दमदाटी केली. यावेळी संशयित त्रिकुटाने त्याच्या ताब्यातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652610470845763584?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652610442236420096?s=20