नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावातील गांधी पुतळा भागात भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७९ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. शेख अब्दूल अलिम अब्दूल रऊफ (रा.गुलजारवाडी ना.रोड) असे मृत वृध्द व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख शनिवारी देवळाली गावातील गांधी पुतळा भागात रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. रस्ता क्रॉस करीत असतांना अचानक भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने शाम सिसोदे यांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652610529440206849?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652610497609609216?s=20