नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तपोवन परिसर हा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे ख्यात आहे. याचठिकाणी कुंभमेळा काळात साधू-महंतांचे आखाडे वास्तव्यास असतात. मात्र, कुंभमेळा वगळता अन्य काळात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारीच्या विळख्यात असल्याचे दिसून येते. काल याच परिसरात विधवा महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर आता चाकूचा धाक दाखवित टोळक्याने तरुणाची लूट केल्याची घटना घडली आहे.
तपोवनातील सांडपाणी शुध्दीकरण केंद्र परिसरात चाकूचा धाक दाखवित टोळक्याने तरूणाची लुट केली. या घटनेत तरूणाचा मोबाईल व गळयातील चांदीची साखळी भामट्यांनी बळजबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी योगेश दिलीप करपे (२६ रा. रामकृष्णनगर, शांतीनगर, मखमलाबाद) या युवकाने तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करपे बुधवारी (दि.२६) तपोवनात गेला होता. सांडपाणी शुध्दीकरण केंद्राजवळून तो पायी जात असतांना चार जणांच्या टोळक्याने वाट अडवून ही लुटमार केली. अज्ञात टोळक्याने करपे यास चाकूचा धाक दाखवित त्याचा मोबाईल व गळय़ातील चांदीची साखळी असा सुमारे १२ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक अशोक पाथरे करीत आहेत.
⭕ नाशिक बाजार समिती निवडणुकीची राज्यभरात चर्चा…
*मतदारांना मिळतेय अशी पंचतारांकीत सुविधा*
(बघा व्हिडिओ)
https://t.co/f6TfjYd5DY #indiadarpanlive #nashik #apmc #election #voter #five #star #facility— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 28, 2023
? इंडिया दर्पण विशेष – वास्तू शंका समाधान –
*घरामधली ऊर्जा कशी टिकवावी?* घ्या जाणून सविस्तर…
https://t.co/uMYSVlB5pK#indiadarpanlive #vastu #shanka #samadhan #home #energy #aura #prashant #chaudhari— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 28, 2023